सौरभ एक मेहनतशील प्रतिभा
दरवर्षी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभावेळी द्वितीय वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यास त्याच्या शैक्षणिक, कला, क्रीडा, लेखन, वक्तृत्व तसेच समाज कार्य यामधील उल्लेखनीय कामगिरी करता राष्ट्रपती सुवर्णपदक दिले जाते. विद्यार्थ्यांच्या कारकीर्दीत ही प्रतिष्ठित कामगिरी असल्याचे मानले जाते. भौतिकशास्त्र विभागातील एम एस भाग दोन चा वर्गप्रतिनिधी सौरभ संजय पाटील याने यावर्षी यासाठी अर्ज केला होता. अर्जाची छाननी करून त्याच्या नावाची शिफारस केल्यानंतर त्याच्यात दडलेली प्रतिभा लक्षात आली. नंतर त्याची मुलाखत घेण्यात आली आणि शिवाजी विद्यापीठातर्फे दिले जाणारे यावर्षीचे राष्ट्रपती सुवर्णपदक अपेक्षितपणे सौरभला जाहीर झाले. ती अर्थातच योग्य निवड होती. अस्सल प्रतिभेचा हा सन्मान होता. सुरुवातीपासूनच सौरभने शैक्षणिक उत्कृष्टता जपली आहे. प्रतिभावंत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी त्याची यशोगाथा एक प्रेरणास्त्रोत ठरेल. तरुणांसाठी ही प्रेरणादायक मशाल असू शकते.
कोल्हापूर जिल्यातील कागल तालुक्यातील कौलगे या खेडेगावातील प्राध्यापक डॉ संजय व संगीता पाटील यांच्या पोटी २१ जानेवारी १९९८ रोजी सौरभ चा जन्म झाला. शिक्षणाचे बाळकडू घरातूनच मिळाले ! पालक जरी शिक्षक असले तरी अशा घरी पाल्यांत प्रतिभेचा विकास होताना आपल्याला क्वचितच आढळतो. पण सौरभ च्या बाबतीत ती प्रतिभा अंतर्भूत असल्याने ती विकसीतच होत गेली.
त्याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जीवन शिक्षण विद्यामंदिर कौलगे या प्राथमिक शाळेत झाले. तो नेहमी अव्वल स्थानी राहत असे आणि सर्व परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवायचा. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत त्याला ३०० पैकी तब्बल २८४ गुण मिळाले होते. सहाव्या इयत्तेत असताना भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत तो जिल्ह्यात बारावा आला होता. तर सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पंचविसावा आला होता. गुणवत्ता ही नसानसात ठासून भरलेली होती याचे हे पुरावे होते. ज्या क्षेत्रात पाऊल ठेवायचे तेथे उत्कृष्टता मिळवायची हा ध्यासच जणू त्यांन लहानपणापासून घेतला होता. शिष्यवृत्ती परीक्षेतील यश हे जन्मजात प्रतिभा आणि मेहनती क्षमता असल्याचा पुरावा मानला जातो. या सुरुवातीच्या काळातील परीक्षा पाठांतरावर आधारित वाटत असल्या तरी नंतरच्या काळात त्याने यातील यश आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे प्राप्त केले होते हे सिद्ध केलं आहे.
तो विवेकानंद महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन आणि क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्पर्धांमधील कामगिरीच्या जोरावर अष्टपैलू व्यक्तीमत्वासाठीच्या प्रथम "स्टुडंट ऑफ द इअर" पारितोषिकाचा मानकरी ठरला होता. प्राधान्यक्रम, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा व नाविन्यपूर्ण विचार हे त्याच्या यशाचे सूत्र आहे. भौतिकशास्त्र हा विषय जीवनात उपयुक्त अशा विश्लेषणात्मक आणि तर्किक मानसिकतेसाठी उपयोगी पडतो. म्हणून त्यांने बीएससीसाठी भौतिकशास्त्र हा प्रमुख विषय निवडला. बीएससी च्या तिन्ही वर्षात तो ९५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून प्राविण्यासह विद्यापीठात प्रथम आला होता. संशोधन करीयर डोळ्यासमोर ठेवून २०१९ साली त्याने एमएससी भौतिकशास्त्र या विषयास प्रवेश घेतला. इथेही तो प्रगतीपथावर आहे. लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर शक्य होईल तेव्हा प्रकल्पांमध्ये योगदान देत आहे. स्थानिक वर्तमानपत्रात कोरोनाविषयी चार संशोधन लेेख प्रसिद्ध केले तसेच जवळजवळ पन्नास ऑनलाईन कार्यशाळा मध्ये सहभाागी झाला आहे. बऱ्याच आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्याने सहभाग नोंदवला आहे तर काही ठिकाणी शोधनिबंध सादरीकरण देखील केले आहे. त्याने त्या जगाचे अन्वेषण करण्यास सुरवात केली आहे, ज्यामध्ये त्याला आपली कारकीर्द बनवायची आहे.
सौरभने आजवर समाजिक कार्यात देखील भरीव कामगिरी केली आहे. त्याला मिळालेल्या इनस्पायर शिष्यवृत्तीतून त्याने चेतना अपंगमती विद्यालयातील दिपक वडार या विद्यार्थ्यांचे एक वर्षासाठी शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेले होते. तसेच कुरुकली येथील नंदी बैलावर उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबाच्या घराला आग लागली होती व त्यांचे फार मोठे नुकसान झाले होते. सौरभने त्या घरातील सहावीत शिकत असलेल्या मुलीचा सहावी ते दहावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च उचलला आहे. वृद्धाश्रम, जनजागृती रॅली यात त्याने हिरिरीने भाग घेतला आहे. त्याने कोविडच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेचा कोविड- १९ चा प्रोग्रॅम पूर्ण केला आहे.
मला भावलेला त्याचे गुण म्हणजे विनय, साधेपणा आणि जतन करण्याची सवय. त्याचे पहिलीपासून आत्तापर्यंतचे सर्व गुणपत्रके, प्रमाणपत्रके, फोटो, सर्व कागदपत्र इतकी छान आणि व्यवस्थित जतन करून ठेवले आहेत की काय बोलता सोय नाही ..
डॉ केशव यशवंत राजपुरे
Very nice Sir.Thanks for sharing such a good blog.
ReplyDeleteVery much inspirational and motivational journey of Sourabh Patil and very well written by you Sir👍👍 Thank you so much sharing the same. You are really doing great work with this blog Sir ... This will definitely ignite hundreds of young minds..and motivate them to shift towards better purpose of life. Thank you so much again Sir..please keep posting.. And keep inspiring...
ReplyDeleteWith respectable regards,
Yours sincerely,
Ulka
💐💐💐मनापासून अभिनंदन तसेच भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐
ReplyDeleteWell done sirji
ReplyDeleteCongratulations sourabh
ReplyDeleteसर, लेख खूप छान, विस्तृत, सविस्तपणे लिहला असून चि. सौरभ ची शैक्षणिक यशोगाथा अगदी प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत मांडली आणि सदर गाथा इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा दायी ठरेल यात वादच नाही. परंतु तुम्ही ही बाब शेअर करून मोलाचे कार्य केले आहे तसेच विद्यार्थ्याचा गुण गौरव व कौतुक करणारा तुमच्यासारखा शिक्षक सुद्धा तेवढाच महान मानावा लागेल. सर,दोघांचेही अभिनंदन !!
ReplyDeleteआदरणीय सर
ReplyDeleteलेख अतिशय समर्पक व प्रेरणादायी आहे
धन्यवाद
डाॅ केशवराव राजपुरे सर आपले सर्व प्रथम मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आपण सौरभ पाटील या विद्यार्थ्यांचा जो लेख लिहिला आहे. तो अविस्मरणीय असा आहे. तुमच्या सानिधयात आल्या वरती आसे हिरे घडत आहेत. हेच तुम्ही जे शाळेसाठी विद्यार्थ्यासाठी रात्रंदिवस कष्टाचे फळ आहे.विद्यापिठ, जिल्हा, महाराष्ट्र, देशासाठी आसी मुले घडत आहेत.यामुळे भारत देशाचे नाव उज्ज्वल व्हायला वेळ लागणार नाही.तुमच्या किर्तीचा डंका आसाच जगभर वाजत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना. तसेच कुमार सैरव पाटील याचे मःन पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा.सैरव पाटील याच्या प्रगतीचा डंका आसाच वाजत रहावो. सैरव ने जे यश प्राप्त करून स्वताचे, आई वडिलांचे,गुरूजनांचे,विद्यापीठाचे, जिल्हायाचे महाराष्ट्राचे व देशाचे,नाव उज्ज्वल केले आहे. त्या बद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन.दिवस रात्र मेहनतीचे हे फळ आहे. यात तिळमात्र शंका नाही.तुझी अशीच उत्तरो उत्तर प्रगती होत राहो हिच श्रीचर्णी प्रार्थना. परत एकदा तुझे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा.जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी विद्यापीठ.क्रमश 🇮🇳🇮🇳🚩🙏🙏दिलीप अनपट.काही चुकलं असल्यास क्षमस्व 🙏🙏
ReplyDeleteखूपच छान!सौरभ बद्दलची एवढी संकलीत माहिती ही फक्त एक उत्कृष्ट शिक्षकच देऊ शकतो.सौरभच्या भावी वाटचालीत सर आपला खूपच मोलाचा वाटा आहे .आपणाकडून सौरभ सारखे लाखो विद्यार्थी घडवले जावेत ही शुभेच्छा!सौरभला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
ReplyDelete