पांडूरंगा
देव अदृश्य शक्ती आहे. विज्ञानाने एव्हढी क्रांती घडवूनसुद्धा मानवजात त्याच्या शक्तीचा अभाव सिद्ध करू शकत नाही. याबाबत प्रत्येकाच्या सापेक्ष संकल्पना ! असं मानलं जातं - देव हा भक्ताच्या भक्तीला भुकेला असतो. देवाला प्रसन्न करण्यासाठी माणूस हा भक्तीत वेढा होतो.
त्यामुळे प्रश्न येतो: जर या अदृश्य शक्तीस आतापर्यंत कोणीही पाहिलेले नाही, तर मग या आभासी गोष्टीच्या मागे न लागता प्रतीकात्मक माणूसकीरुपी देवाला का शोधले जात नाही ? देव हा माणसामध्येच आहे, त्याच्या सत्कर्मात आहे, त्याच्या माणूसकीमध्ये आहे हे का सर्वमान्य होत नाही ? या २१ व्या शतकातदेखील सर्वचजण त्या काल्पनिक यश आणि सुखाच्यामागे धावत आहेत की जे त्यांना कधीही सापडणार नाही. थोडेसे प्रयत्न केल्यानंतर, प्रत्येकजण यशाचा आणि पर्यायाने सुखासाठीचा शॉर्टकट शोधतो, जो त्यांच्या चंचल मनाला सापडत नाही. मग तो त्यासाठी निष्क्रिय प्रयत्न सुरू करतो. तो समाजातील शिकलेल्या, जगाकडे भिन्न दृष्टीने बघणाऱ्या, व्यक्तीला भेटतो, ज्याने मानवी मानसशास्त्रचा यथासांग अभ्यास केला आहे. त्याच्याकडे समोरच्यापेक्षा एखादी गोष्ट चांगल्या रीतीने स्पष्ट करण्याची कला असते. मग तो या माणसाचा दास बनतो कारण याची अशी धारणा असते की हाच मनुष्य मला परमेश्वराकडे घेवून जाणार. तो या मानसिकतेचा फायदा घेतो आणि आपला उद्देश सफल करतो. त्यांना असे वाटते की जर आपण या व्यक्तीला पैसे, सोने किंवा वस्तू दान केले तर ते देवाला अर्पण करण्यासारखे आहे. देव खुश होवून आपल्याला लवकर सुखी करेल. त्यामुळे देवदेर्शनाचा मार्ग म्हणजे एक व्यवसाय झाला आहे. ज्यांचा उद्देशच वाम आहे त्यांच्याकडून वाममार्ग, क्रूरकर्म अपेक्षितच ! हे सर्व आपण आपल्या स्वत:च्या विचाराने करतो. जे काही थोडे सुख प्राप्त होते ते त्याच्यात श्रद्धेमुळे वाढलेल्या आत्मविश्वासाने, बाबाच्या योगदानामुळे नव्हे. शेवटी फसगत होते.
माणूस किती स्वार्थी आहे बघा ना ? आपण खर्चीलेल्या पैशात परतीची अपेक्षा करतो. आपण मदतरुपी केलेल्या खर्चामुळे ही मानवजात टिकणार आहे याचा अजिबात विचार करत नाही. त्यामुळे गोर-गरीब, गरजू, ना ते मदत कशाला करतील ?
जरी आपल्या मताप्रमाणे इच्छेप्रमाणे निसर्गाची चक्रे फिरत नसली तरी तो प्रारब्धाचा खेळ आहे, असे समजून प्रत्येकाने आनंदी राहवे . आनंदी नसताना जीवनाची पाऊले टाकत राहिल्यास प्रकृतीचे फारच नुकसान होते. काळजी घ्या ...
- केशव
No comments:
Post a Comment